रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (10:07 IST)

किरीट सोमय्या भाजपचे 'आयटम गर्ल', नवाब मलिकांचं वादग्रस्त विधान

भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांच्या मंत्रालयातील व्हायरल फोटोवरुन वाद सुरू आहे. सरकारने किरीट सोमय्या यांना नोटीस बजावली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही टीका केली जात आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांना बॉलिवूडमधील 'आयटम गर्ल'ची उपमा दिली आहे
 
किरीट सोमय्या राजकारणात भाजपच्या 'आयटम गर्ल'प्रमाणे काम करत असल्याचं मलिक म्हणाले आहेत. बातमी कशी होईल यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे असंही ते म्हणाले.
 
बॉलिवूडमध्ये एखादा सिनेमा चालवण्यासाठी 'आयटम गर्ल'ची गरज भासते. त्याप्रमाणे किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रात भाजपच्या 'आयटम गर्ल'सारखं काम करत आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोविषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, "ज्याने तो फोटो काढला, त्यांनी जाहीर करावं की, तो नगरविकास खात्यातला आहे. नगरविकास मंत्र्यांनी किंवा सचिवांनी सांगावं त्या फोटोबद्दल सांगावं