बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (21:08 IST)

दोन वर्षानंतर पुणे-बारामती आणि बारामती-दौंड रेल्वे सेवा अंशत: सुरू होणार

पुणे-बारामती आणि बारामती-दौंड रेल्वे सेवा अंशत: सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. साधारण 2 वर्षांपासून बंद असलेली रेल्वेसेवा पुन्हा अंशत: सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये थेट बारामती – पुणे  रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात अजुन कोणताही निर्णय झालेला नाही. गुरुवारपासून (27 जानेवारी) पुणे ते बारामती आणि बारामती ते दौंड (अशा 2 फे-या होणार आहेत. असं रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, रेल्वेच्या माहितीनूसार, गुरुवारपासून सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरुन 10 डब्यांची डेमू रेल्वे सुटेल.ती पावणेनऊ वाजता दौंड रेल्वे स्थानकावर येईल.5 मिनिटांचा थांबा घेऊन ती मळदगाव, शिरसाई, कटफळ मार्गे बारामतीत 10.15 वाजता दाखल होईल.हीच गाडी 3 तासांचा थांबा बारामतीत घेऊन पुन्हा दुपारी 1.25 वाजता दौंडकडे रवाना होणार आहे. दौंडला ही गाडी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.