बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (19:46 IST)

बारामतीमध्ये आरोग्यास अपायकारक खवा विकल्याबद्दल दुकानदारावर कारवाई

बारामतीमधील हिंद स्वीट्स या भिगवण रस्त्यावरील दुकानात 50 किलो स्वीट खवा आढळून आल्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाने या दुकानावर करावाई केली आहे. तसेच खव्याचे नमुने जप्त करण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
 
आज दुपारी अन्न व औषध खात्याने ही करावाई केली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राहुल खंडागळे यांनी या संदर्भात माहिती दिली. येथील हिंद स्वीट्स या दुकानावर खात्याच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी त्यांच्याकडे पामोलिन तेल, दूध पावडर व रंग या पदार्थांपासून आरोग्यास अपायकारक असलेल्या खवा तयार करण्यात आल्याचे आढळून आले. दरम्यान या दुकानाचा परवाना नसल्याने हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.