मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (18:50 IST)

दिवाळीच्या तोंडावर पावसाचं सावट

ऐन दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीच्या दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे असून 2 नोव्हेंबरनंतर चार ते पाच दिवस काही भागांत पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.
 
1 ते 3 नोव्हेंबरला राज्यातील दक्षिण कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या तोंडावर पाऊस आता आनंदावर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, श्रीलंका आणि तमिळनाडूच्या परिसरात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या काही दिवसात देशातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हळूहळू हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेच्या दिशेने सरकता दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस हजेरी लावू शकतो. तर तमिळनाडूला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
 
देशाच्या दक्षिण भागात सध्या पाऊस होतो आहे. पुढील एक दिवसात बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनरपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. याचा परिणाम राज्यावर काही प्रमाणात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात 2 नोव्हेंबरपासून दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक भागात पावसाची शक्यता आहे.