मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (12:49 IST)

दिवाळी भेट म्हणून मुंबई पोलिसांना प्रत्येकी 750 रुपये

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडं उत्साहाचं वातावरण असलं तरी मुंबई पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबई पोलिसांना दिलेली दिवाळी भेट.
 
दिवाळीच्या निमित्तानं मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 750 रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली आहे. मात्र, ही पोलिस कर्मचाऱ्यांची चेष्टा असल्याचं मत पोलिस दलातून उमटत आहे.

प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला सबसिडी कँटिनमधून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून 750 रुपयांची खरेदी करता येईल. त्यावर लागलेली रक्कम मात्र त्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
 
पोलिस कल्याण निधीतून ही भेट दिली जाणार आहे. मात्र बेस्ट किंवा पालिका कर्मचारी यांना भरघोस बोनस आणि पोलिसांना केवळ 750 रुपये दिल्यानं पोलिस कर्मचारी नाराज आहेत.