शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (09:43 IST)

फटाक्यामुळे चिमुकल्याने गमावला डोळा

फटाक्यामुळे चिमुकल्याला आपला डोळा गमवावा लागला. हा अपघात हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे झाला आहे. साईनाथ घुगे नावाचा 9 वर्षाचा मुलगा फटाके फोडत असताना पेट घेतलेला फटाका उडून थेट त्याचा डोळ्याला लागला  आणि त्याचा डोळ्याला दुखापत झाली. डोळ्याला झालेल्या दुखापती नंतर त्याला तातडीने नांदेडच्या रुग्णालयात नेण्यात आले, नंतर त्याला अधिक चांगल्या उपचारासाठी हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले परंतु या अपघातात त्याचा डोळा वाचविण्यात डॉक्टर अपयशी ठरले. आणि साईनाथला आपला एक डोळा कायमसाठी गमवावा लागल्याचे वृत्त मिळाले आहे.