मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (08:19 IST)

आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने शेजाऱ्याचा चिरला गळा; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

The young man slit his neighbor's throat in anger at his mother; The accused himself appeared at the police stationआईला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने शेजाऱ्याचा चिरला गळा; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर  Maharashtra News Regional Marathi News  In Webdunia Marathi
एका 49 वर्षीय व्यक्तीची गळा चिरून हत्या  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीने आरोपी तरुणाच्या आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने ही हत्या  केल्याची प्राथमिक माहिती समजते. आरोपीने हत्या केल्यानंतर स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. 
 
याबाबत माहिती अशी की, गंगाधर उर्फ बंग्या नत्थु निमजे  असं हत्या झालेल्या 49 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.तर आकाश विजय श्रीपाद  असं आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव आहे.आरोपी आणि मृत हे मोहाडी येथील गांधी वार्डात एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपी आणि मृत व्यक्तीचं नेहमी एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. दोन्ही कुटुंबाचे संबंधही चांगले होते.
 
दरम्यान घटनेच्या दिवशी मृत गंगाधर निमजे याने मद्यपान करत आरोपी आकाशच्या घरी आला.यावेळी दारुच्या नशेत निमजे यांनी कोणतंही कारण नसताना आकाशच्या आईला शिवीगाळ केली.त्याला जाब विचारला असताना, त्याने घरासमोर उभ्या असलेल्या ओमनी कारची तोडफोड केली.गंगाधरच्या या कृत्याने संतापलेल्या आकाशने सायकलचा काटेरी कुंपण गेयर निमजे यांच्या गळ्यावर मारला.जोरात मार लागल्याने ते खाली कोसळले. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी आकाश विजय श्रीपाद हा मोहाडी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. आणि घटनेबाबत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर, पोलिसांनी आरोपी आकाशला अटक  केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.