रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (10:10 IST)

हृदयद्रावक ! पत्नीच्या गळा आवळून खून करून पतीची आत्महत्या

जळगावातील पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे सतीश आणि गायत्री परदेशी दाम्पत्य राहात असे. त्यांना दोन अपत्ये होती सहा वर्षाचा मुलगा आणि चार वर्षाची मुलगी. गुरुवारी घरातली सर्व मंडळी झोपलेली असताना त्याने झोपलेल्या आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला आणि घराबाहेर येऊन आरडाओरड करू लागला. त्याला आरडाओरड करताना बघून शेजारीच राहणाऱ्या त्याचा लहान भावाने संदीपने त्याला अडविले आणि तू का आरडाओरड करत आहे? आणि रात्रीच्या वेळी कुठे जात आहे असे विचारता त्याने मी माझ्या बायकोला ठार मारले आहे असं सांगितल्या वर संदीप घराच्या आता गेल्यावर त्याला गायत्रीचे मृतदेह दिसले आणि दोघे मुलं झोपलेल्या अवस्थेत दिसले. 

सतीश आणि संदीप यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी सतीश आणि त्याचे कुटुंब नाशिक जाणार होते. त्यासाठी ते त्यादिवशी लवकर झोपले होते. सतीशने पत्नी गायत्री हिचा गळा आवळून खून केला नंतर गावातील माजी सरपंचाच्या शेतात जाऊन पळसाच्या झाडावर चढून स्वतःच्या अंगातील घातलेले स्वेटर आणि पेंट चे दोन तुकडे करत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा शोध कुटुंबातील सदस्य घेत असता त्यांना हा शेतातील पळसाचा झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मयत पत्नी आणि सतीश चे मृतदेह शवविच्छेदनास पाठविले आहे. पिंपळगाव पोलिसांनी आत्महत्या आणि खुनाचा गुन्हा म्हणून घटनेची नोंद केली आहे. सतीशच्या मानसिक अवस्थेत बिघाड असल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.