1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (10:44 IST)

उत्पल पर्रिकरांच्या मुद्यावरून शिवसेनेत दोन गट?

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तर दुसरीकडे पर्रिकर कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेशी संबंध जोडावा असं आवाहान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. परंतु स्थानिक शिवसैनिकांनी याला विरोध दर्शवल्याचं शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
 
उत्पल पर्रिकरांच्या पक्ष प्रवेशाच्या मुद्यावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे.
 
उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असतील तर सर्व पक्षांनी राजकीय मतभेद विसरून त्यांना समर्थन द्यावे असंही संजय राऊत म्हणाले होते.
 
मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला तिकीट नाकारणे हा खूप मोठा अन्याय असल्याची टीका उदय सामंत यांनी केली आहे. पर्रिकर गोव्यामध्ये 40 तिकीटं वाटायचे. आता त्यांच्या मुलाला तिकीट नाकरणं हा अन्याय आहे असंही ते म्हणाले आहेत.