सोमवार, 4 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (20:47 IST)

किल्ले रायगडावर धार्मिक प्रार्थनास्थळ उभे करण्याचा प्रयत्न

किल्ले रायगडावर रंगरंगोटी करून चादर पसरवून धार्मिक प्रार्थनास्थळ उभे करण्याचा प्रयत्न संभाजीराजे छत्रपती यांनी हाणून पाडला आहे. रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती शिवप्रेमींनी दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत पुरातत्व खात्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुरातत्त्व खात्याने त्वरित कारवाई करून सदरचे ठिकाण पूर्ववत केले आहे. तसेच तिथे सुरक्षा रक्षकाची नियुक्तीही करण्यात आली आहे.
याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबूक पोस्टवरून माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दुर्गराज रायगडावरील मदार मोर्चा येथील प्रकाराची दखल घेत आज सकाळीच मी पुरातत्त्व विभागास पत्र लिहून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावतीजी आणि मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला. तसेच तात्काळ याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले. यास प्रतिसाद देत पुरातत्त्व विभागाने मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे. तसेच त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.