मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न, ऑडीओ क्लीप व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यांच्या याच दौऱ्याची जोरदार तयारी शिंदे गटाकडून सुरु असताना कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांची एक ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे.
या ऑडीओ क्लीप मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अडीचशे ते 300 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणण्याचे असे देखील ऑडिओ क्लीपमध्ये संभाषण आहे. ही ऑडिओ क्लीप कधीची आहे? आताची आहे की जुनी आहे? हे स्पष्ट होत नाही .
या ऑडिओमध्ये "आपण 400 रुपये पण दिले असते पण पैशाचा विषय त्यांच्या हातात आहे. भाऊ पैसे ते देणार की तुम्ही देणार..., नाहीतर तिथे गेल्यावर असं नाही झालं पाहिजे. पैसे कोण देणार? आपल्याकडे त्यांनी अडीच लाख रुपये पाठवले होते. बरं का...मी सचिनलाही म्हटलं भाऊ.. आपल्याकडे नको घेऊ पैसे... नाहीतर अर्धे खाल्ले आणि अर्धे दिले, अशा पध्दतीचा आरोप होतोय... तुम्ही पण करोडपती आहे त्यामुळे पैशाची चिंता नाही तसं..." असे संभाषण करण्यात आले. हे संभाषण कुणाचे आहे ते अद्याप कळू शकलं नाहीये. पण, भुमरेंच्या मुलाचा उल्लेख ऑडिओ क्लीपमध्ये करण्यात आलाय. सभेला गर्दी जमा करण्यासाठीची ही बातचीत आहे.