शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (07:39 IST)

मतदान करू नये म्हणून अटकेचा प्रयत्न; रवी राणांचा मविआवर आरोप

विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून  दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. मी भाजपला मतदान करू नये, यासाठी मविआने मला अटक करण्यासाठी मुंबई  आणि अमरावती पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी पाठवले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारित केलेल्या व्हिडीओतून हा आरोप करण्यात आला आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य विरूद्ध राज्य सरकार हा संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अमरावतीचे महापालिका आयुक्त यांच्यावरील शाईफेक प्रकरणात हे वॉरंट काढण्यात आलं आहे. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. मी भाजपला मतदान करू नये, यासाठी मविआने मला अटक करण्यासाठी मुंबई आणि अमरावती पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी पाठवले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.