1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Bachchu Kadu makes a major statement regarding making Eknath Shinde Chief Minister again

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचं बच्चू कडूंचे मोठे विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताच पक्षाने बच्चू कडू यांना विधान परिषदेची (MLC) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
 
राजकीय पुनर्वसन
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर, बच्चू कडू यांचा हा निर्णय त्यांचे राजकीय पुनर्वसन मानला जात आहे. यामुळे विदर्भात महायुतीची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
 
एकनाथ शिंदेंना पाठिंबा
अमरावतीच्या चांदूरबाजार येथे आयोजित सभेत बोलताना कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. "एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कडू यांनी स्पष्ट केले की, राजकीय कार्यासाठी ते आता पूर्णपणे शिवसेनेत सक्रिय राहतील, मात्र त्यांची 'प्रहार जनशक्ती संघटना' एक सामाजिक संघटना म्हणून यापुढेही समाजसेवेचे काम करत राहील.
 
एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना रात्री-अपरात्रीही धावून जाणारे संवेदनशील नेतृत्व आहे. मी आजवर अनेक मुख्यमंत्री अनुभवले, पण जनतेच्या मदतीसाठी इतकी तत्परता दाखवणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. विशेषतः माझ्या दिव्यांग बांधवांसाठी देशातलं पहिलं स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याचं धाडसी पाऊल त्यांनी उचललं. त्यामुळे आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवणं हेच आमचं ध्येय आहे आणि ते साध्य केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
मुंबई पासून सिंधुदुर्गपर्यंत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची भीषण लाट