1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Bachchu Kadu will take a decision today on whether to join the Shinde faction

बच्चू कडू यांची मोठी घोषणा? शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांवरून पर्दा खेचणार

माजी मंत्री बच्चू कडू यांचा पक्ष प्रहार हा शिवसेनेत विलीन होण्याचा चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. 
राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या चर्चांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आज मोठी घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. आज दुपारी 12 वाजता कडू हे मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात ते आपला निर्णय देणार आहे. 
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात सामील होणार का, यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. या सर्व चर्चांवर आज बच्चू कडू पडदा टाकणार असल्याचे समोर आले आहे.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून बच्चू कडूंना मोठी ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलिनीकरण केल्यास विधानपरिषद सदस्यपदाची संधी दिली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
स्वतः बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना, “अनेक अफवा सुरू आहेत, मी उद्या सकाळी 12 वाजता सर्व स्पष्ट करणार,” असे सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार की स्वतंत्र भूमिका कायम ठेवणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
 
प्रहार पक्षातील काही कार्यकर्त्यांनी मात्र विलिनीकरणाला विरोध दर्शवल्याची माहिती आहे. पक्षाची स्वतंत्र ओळख आणि आंदोलनाची भूमिका कायम ठेवावी, अशी भावना अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याचे सांगितले जाते. पक्ष विलीन न करता विधानपरिषदेची जागा द्यावी अशी अंतिम भूमिका बच्चू कडू यांची असू शकते. 
 
जर बच्चू कडू यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर विशेषतः विदर्भात शिवसेनेची ताकद वाढू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र त्यांनी नकार दिल्यास महायुतीच्या राजकारणात वेगळे समीकरण तयार होऊ शकते. त्यामुळे आजची घोषणा राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
Edited By - Priya Dixit
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
ठेल्यावरील गोलगप्पे खाल्ल्याने एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, ४९ जणांना विषबाधा