मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (08:44 IST)

बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना अक्षरश: हाकलून दिलं-शिवाजीराव चोथे

rane
शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी नारायण राणेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणेसारख्या माणसाने महाराष्ट्रातील जनतेला गद्दारी कुणी केली? याबाबत शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना अक्षरश: हाकलून दिलं होतं. मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या राणेसारख्या लोकांनी म्याव म्याव करू नये, अशी बोचरी टीका चोथे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राणेंना हाकलून दिलेल्या बैठकीचा देखील उल्लेख केला आहे. ते जालन्यात एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
 
संबंधित प्रसंगाबाबत बोलताना शिवाजीराव चोथे म्हणाले की, “नारायण राणे आणि मी १९९५ साली एका सरकारमध्ये होतो. ते एक मंत्री होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री कसे झाले? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी कुणाशी गद्दारी केली? हे राणेसारख्या माणसानं महाराष्ट्रातील जनतेला शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक हे वाघ आहेत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे सारख्या वाघाचा बछडा आहेत. त्यामुळे मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या राणेसारख्या लोकांनी म्याव म्याव करण्याची आवश्यकता नाही.”