रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2019 (17:15 IST)

काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदी बाळासाहेब थोरात

काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी निवड केली आहे. काँग्रेस कमिटीने त्यांच्या या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
 
माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. थोरात यांच्यासह नसीम खान यांची विधानसभेच्या उपनेतेपदी निवड केली आहे. तर बसवराज पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड केली आहे. 
 
के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. विधानपरिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे, उपनेतेपदी रामहरी रुपनवार, तर प्रतोदपदी भाई जगताप यांची निवड केली आहे.