सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (18:33 IST)

बन्नंजे राजासह आठजणांना जन्मठेप : उद्योजक आर. एन. नायक खून खटल्यातील आरोपींना शिक्षा

jail
उद्योजक आर. एन. नायक खून प्रकरणी बेळगाव येथील कोका न्यायालयात दि. 30 मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान बन्नंजे राजाला दोषी ठरविण्यात आले होते. दरम्यान आज कोका न्यायालयात शिक्षेचे प्रमाण घोषित करण्यात आले. यात बन्नंजे राजासह आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून प्रत्येकी 5 लाख असा एकूण 40 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर अन्य एकाला 5 वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे.