बांदा : निकृष्ट दर्जाचे झेंडे इन्सुली ग्रामपंचायती कडून परत
बांदा :ग्रामपंचायत इन्सुली यांना देण्यात आलेले झेंडे हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पंचायत समिती सावंतवाडी यांना परत देण्यात आलेले आहेत. नवीन झेंड्याची सोय करण्यात येईल. मात्र एकंदरीत प्रशासनाकडून देण्यात येणारे झेंडे हे चांगले नसल्यामुळे ग्रामस्थ यांनी आपल्या साठी झेंडे खरेदी केले तर चांगले होईल. ग्रामपंचायत यांना देण्यात येणाऱ्या झेंड्याची रक्कम सुद्धा ग्रामपंचायत च्या निधीमधून वर्ग करण्यात येणार होती. अशा परिस्थितीत खराब माल का घ्यावा असे मत झाल्यामुळे सदरचे झेंडे परत देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत च्या माध्यमातून कमी दरात मिळणारे चांगल्या प्रतीचे झेंडे पुरवठा करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. कुठच्याही परिस्थिती मध्ये इन्सुली गावात हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येईल अशी ग्वाही सरपंच इन्सुली यांच्याकडून देण्यात येत आहे.