रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (21:29 IST)

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव, अन ओ शेठ म्हणत धरला ठेका

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झालाय. शिंदे यांच्या या पराभवाने त्यांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांनाच प्रचंड आनंद झाला आहे. बरं हा नेता केवळ आनंद व्यक्त करून थांबला नाही. गुलालांची प्रचंड उधळण करत आणि ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट…. या गाण्यावर जबरा ठेका धरत या नेत्याने आनंद व्यक्त केला. 
 
या निवडणुकीत मानकुमरे यांनी थेट विरोधी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना उघड पाठिंबा दिला होता. तसेच जावळी मतदारसंघातील निवडणूक मतदान प्रतिनिधांना महिभार टूर घडवली होती. या 25 मतदारांना केरळपासून ते गोव्यापर्यंत त्यांनी फिरवून आणले होते. या निवडणुकीत रांजणे यांना 25 तर शिंदे यांना 24 मते मिळाली. अवघ्या एका मताने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मानकुमरे प्रचंड खूश झाले. त्यांनी आपल्या समर्थकांसह गुलालाची उधळण करत आणि डीजे लावत जल्लोष केला. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट…. या गाण्यावर त्यांनी थेट तालच धरला. मानकुमरे यांचा जबरा डान्स पाहून कार्यकर्तेही आश्चर्यचकीत झाले आणि त्यांनीही ताल धरला.