नागपुरात 2000 च्या नोटा बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, शेंगदाणे विक्रेता निघाला सूत्रधार
Nagpur News : 2000 च्या नोटा बदलणाऱ्या टोळीचा नागपुरात पर्दाफाश झाला आहे. कमिशनवर दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा तपास करणाऱ्या नागपूर पोलिसांनी एका शेंगदाणा विक्रेत्यासह चार जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात 2000 रुपयांच्या नोटा बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.कमिशनवर दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा तपास करणाऱ्या नागपूर पोलिसांनी एका शेंगदाणा विक्रेत्यासह चार जणांना अटक केली आहे. आरोपींपैकी नंदलाल मौर्य हा संविधान चौक परिसरात एका गाडीवर शेंगदाणे आणि इतर वस्तू विकतो. आरोपी नंदलाल मौर्य हा गरीब महिला आणि पुरुषांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी कमिशनवर ठेवत असे. रविवारी एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे लोक 500 रुपयांच्या नोटांना या नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला त्यांचे आधार कार्ड तपशील देत असत. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते सर्व मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी आहे.
Edited By- Dhanashri Naik