1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2025 (09:26 IST)

भंडारा जिल्ह्यात ड्राय क्लीनिंग दुकानात पाच कोटी सापडले, बँक व्यवस्थापकासह नऊ जणांना अटक

भंडारा जिल्ह्यात ड्राय क्लीनिंग दुकानात पाच कोटी सापडले
Bhandara News: महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात एका ड्राय क्लीनिंग दुकानातून बँकेचे 5 कोटी रुपये सापडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी एका खाजगी बँकेच्या व्यवस्थापकासह नऊ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.  
एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही लोकांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला असे आमिष दाखवले होते की जर त्याने त्यांना 5 कोटी रुपये दिले तर ते त्याला 6 कोटी रुपये देतील. पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीवरून कारवाई करताना, मंगळवारी तुमसर परिसरातील इंदिरा नगर येथील एका ड्राय क्लीनिंग दुकानावर एका पथकाने छापा टाकला आणि एका बॉक्समध्ये ठेवलेले 5 कोटी रुपये जप्त केले. व आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.