बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (07:44 IST)

बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे

uddhav thackeray
तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस शिव्या देते, तर मला, आदित्यला, माझ्या कुटुंबीयांना रोज जे बोलतायत त्याच्याबद्दल तुम्ही गप्प का? माझ्याबद्दल ज्या भाषेत बोलले, त्याबद्दल माझा शिवसैनिक अजून गप्प आहे. तुमची लोकं बोलल्यावर आमची लोकंही बोलणारच, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता ही वज्रमूठ झालीये. याचा हिसका तुम्ही पाहिला आहात. विधान परिषद, बाजार समिती निवडणुकांमध्ये आम्ही सर्वांना चारीमुंड्याचित केलंय, असंही ते म्हणाले. मुंबईतील आयोजित वज्रमूठ सभेत त्यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला.
 
सध्या महाराष्ट्रात बारसूचा विषय भडकेलेला आहे. सहा तारखेला बारसूला जाऊन लोकांना भेटून बोलणार. कसं मला अडवू शकता, तो पाकव्याक्त काश्मीर नाही, बांगलादेश नाही, माझ्या महाराष्ट्रातील रत्नागिरीतील तो भाग आहे. सहा तारखेला आधी मी बारसूला जाणार आणि नंतर महाडच्या सभेला जाणार. तिकडे माझ्या नावाचं पत्र दाखवलं जातं. हो आम्हीच ही जागा सूचवली होती. त्या पत्रात पोलिसांना घुसवा, अश्रूधूर सोडा, वेळेप्रसंगी गोळ्या चालवा पण रिफायनसी करा असं लिहिलंय का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
 
“आज तिन्ही पक्ष एकत्र आहेत. जेव्हा मविआचं सरकार होतं तेव्हा मी पवारांच्या अंमलाखाली गेलो, राष्ट्रवादी दादागिरी करतेय अशी बोंब मारत होते. पण आज उदय सामंत पवारांना भेटले. तुम्ही गेला तर चालतं? पण उद्धव ठाकरेंनी करायचं नाही. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेव्हा यांचा पत्ता नव्हता ते शेफारलेली लोकं मला आज बाळासाहेब शिकवतायत. त्यांना आज सांगायचंय अनेक जण बाळासाहेबांना भेटलाही नव्हता. पण स्वत: शरद पवारांकडे सल्ला मागायला जाता. जर बारसू बारसू करत असाल, तर पालघरमध्ये आदिवसींच्या घरात पोलीस का घुसवले?” असा सवालही त्यांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor