रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (07:30 IST)

संभाजीराजे छत्रपतींनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

sambhaji raje
प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात झालेल्या भेटीबाबत संभाजीराजेंनी ट्विटर माहिती दिली. ‘पुणे येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सुरू असलेले सद्यस्थितीचे राजकारण व राज्यासमोर असलेल्या समस्या, जनतेच्या गरजा – अपेक्षा यांबाबत सविस्तर चर्चा झाली’, असे संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये लिहिले.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती केली. आंबेडकरांची युती ही ठाकरेंसोबत असली तरी, अद्याप महाविकास आघाडीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार का? तसेच, राज्यात नवी युती होणार का? पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार भेट
 
प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात ही भेट होती. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमधील प्रवेशाबाबत ही बैठक नव्हती, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor