मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (21:34 IST)

ओमीक्रॉन विरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हावा, आरोग्य यंत्रणेला विशेष सूचना

Be prepared to fight against Omicron
दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने  शिरकाव केला.या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश विभागातील (MMRDA) सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
 
ओमीक्रॉन व्हेरिएंट धोक्यामुळे राज्याचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे (VC) तातडीची बैठक घेतली. 
 
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब असली तरी यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात, सामान्य नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही, कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत. रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचे निर्देश’ एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
 
 पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन द्याव्या. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या 10 देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व पालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. अति जोखमीच्या देशातून गेल्या 14 दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी विमानतळाकडून घेण्याच्या सूचना देखील शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत.