सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (16:49 IST)

बीड हादरलं : रक्ताचं नातं विसरून 2 नराधम भावांनी बहिणीवर बलात्कार केला

बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सक्ख्या आणि चुलत भावाने बलात्कार करून रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. हे दोघे भाऊ आपल्या बहिणीवर बऱ्याच दिवसांपासून अत्याचार करत होते. दरम्यान पीडित मुलीचे पोट दुखू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले असता मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती वरून घडणारे हे सर्व प्रकार उघडकीस आले. पीडित मुलगी सहा महिन्याची गरोदर आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडील आणि भावासोबत राहते. गेल्या काही दिवसांपासून तिचा 17 वर्षाचा सक्खा भाऊ आणि 15 वर्षाचा चुलत भाऊ तिच्यावर वारंवार बलात्कार करायचे. तिचे पोट दुखू लागल्यामुळे तिला रुग्णालयात नेल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. 
पोलिसांनी दोघा भावांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत नराधम भावांना अटक केली आहे.