शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (15:19 IST)

मराठी साहित्य संमेलन संमेलनस्थळी जायचंय? ‘या’मार्गावर बसेसची व्यवस्था

Want to go to Marathi Sahitya Sammelan
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तमाम नागरिकांना निमंत्रण असून प्रवेश खुला आहे. त्यासाठी स्वतंत्र पास, तिकीट अथवा तत्सम बाबीची काेणती आवश्यकता नसली मात्र काेराेनाच्या अनुषंगाने शासनाने जे निर्बंध जारी केले आहेत, ते पाळणे आवश्यक असणार आहे.
दरम्यान नाशकात उद्यापासून सारस्वतांचा मेळा भरणार असून याबाबत सगळी तयारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. संमेलनासाठी सर्वच नागरिकांना प्रवेश खुला करण्यात आला असून कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
या संमेलनासाठी नाशिकच्या विविध ठिकाणाहून तीनही दिवस बसेसची व्यवस्था केलेली आहे. या बसेस सकाळी ०८ वाजेपासून सुटणार असून त्या साधारण दर १५ मिनीटांनी उपलब्ध हाेतील.
काही प्रतिनिधी संमेलन स्थळी येऊन ऐनवेळेस प्रतिनिधी शुल्क भरु शकतात. त्यांना असे शुल्क तेथे भरता येईल. बाहेर गावाहून काही प्रतिनिधींना निवासाची व भाेजनादी व्यवस्था नकाे आहे त्यांना असे प्रतिनिधी शुल्क भरावे लागणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले.