Ladki Bahin Yojna लाडक्या बहिणींना लवकरच कर्जही मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे, गरीब महिलांना दरमहा १५०० रुपये वाटले जातात. राज्य सरकारने जुलै ते मार्च या कालावधीत या योजनेद्वारे आतापर्यंत २ कोटी ४१ लाख रुपये वाटप केले आहे. तसेच २ मे २०२५ पासून, लाडकी बहीणयोजनेचा एप्रिलचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच अनेक महिलांना योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळत आहे. काहींना त्यांच्या खात्यात थेट ४५०० रुपये मिळाले आहे. तर काही महिलांना फक्त ५०० रुपयांवर समाधान मानावे लागले. मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया २ मे पासून पुढील २ ते ३ दिवस सुरू राहील. या कालावधीत, सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
तसेच माहिती सामोर आली आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांसाठी आता महाराष्ट्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. माहितीसमोर आली आहे की, लाडक्या बहिणींना 40 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे. यावेळी अजित पवारांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली आहे. अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना आता 40 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. तसेच ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र सरकार बँकांसोबत चर्चा करणार आणि व्यवसायासाठी भांडवल म्हणून 40 हजार रुपये कर्ज देणार आहे.
Edited By- Dhanashri Naik