शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (21:17 IST)

भिवंडी :९ वर्षीय चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

तलावाजवळ मुलांसह खेळण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली आहे. आर्यन पिंटूकुमार चंद्रवंशी रा .काटेकर नगर कामतघर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास कामतघर येथील वऱ्हाळ तलावा शेजारील काटेकर क्रीडांगण येथे काही मुले खेळण्यासाठी गेले असता त्यापैकी काही मुले पाण्यात पोहण्यास उतरले असता आर्यनचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केल्या नंतर त्या ठिकाणी नागरीक धावून आले.पण आर्यन चा शोध लागला नाही त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शोध मोहिमे नंतर आर्यनचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.याबाबत शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.