भुसावळला मांस, मद्य विक्रीचे दुकाने सोमवारी बंद ठेवा
भुसावळ : अयोध्या येथे प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर उभारले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात सामाजिक, सांस्कृतिक व सर्व हिंदूचे आस्थेचे प्रतिक प्रभु श्रीराम यांच्या उत्सव सोहळ्यात कुठलेही अपकार्य व अनुचित प्रकार घडू नये,
यासाठी भुसावळ शहरातील सर्व मास विक्री व मद्य (दारु) विक्री करणारे दुकाने येत्या २२ जानेवारी २०२४ ला बंद ठेवण्यात यावे, याबाबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गौरव आवटे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजयुमोचे सरचिटणीस लाजरस मणी, अर्थव पांडे, यशांक पाटील, भाजयुमोचे उपाध्यक्ष चेतन सावकारे, सचिन बऱ्हाटे, गोपीसिंग राजपूत, प्रथमेश कोठारी, लखन रणधीर, रोशन राणे, सागर साळी, पवन बाक्से, भाजयुमोचे चिटणीस हिमांशु दुसाणे, हितेश टकले, भाजयुमोचे सचिव दर्शन चिंचोले, भाजयुमोचे प्रसिद्धी प्रमुख तथा सचिव प्रशांत भट, सोशल मीडिया सागर जाधव, भाजयुमोचे खजिनदार मनीष पाटील, यश चौधरी, ओबीसी सेलचे अध्यक्ष भावेश चौधरी आदी उपस्थित होते.
Edited By - Ratnadeep ranshoor