गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (09:45 IST)

शिवभक्तांच्या टेम्पोचा मोठा अपघात

पुणे जिल्ह्यात एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे परिसरात हा शिवभक्तांच्या टेम्पोचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले आहेत. यापैकी दहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.