घरडा केमिकल प्लांटमध्ये मोठा स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू
रत्नागिरीतल्या खेड एमआयडीसीमध्ये घरडा केमिकल प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या प्लांटमध्ये एकापाठोपाठ दोन स्फोट झाले आहेत. या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसंच या प्लांटमध्ये ४०- ते ४५ कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरडा केमिकल प्लांट सर्वात मोठी केमीकल कंपनी आहे.
घरडा केमिकल प्लांटच्या 7B मध्ये स्फोट झाले आहेत. ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस सकाळच्या शिफ्टला आलेले कामगार कंपनीत होते. ४० ते ५० कामगार कंपनीत असतात. परंतु, नाश्ताची वेळ झाल्याने काही कामगार खाली आले होते. तर उर्वरीत कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्या एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे. या कामगाराला तातडीने मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. बॉयलरच्या स्फोटामुळे कंपनीत भीषण आग लागली.