बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (09:50 IST)

पूर्ववैमनस्यातून नायब तहसीलदाराची हत्या

तहसील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले नायब तहसीलदार मोहन पेंदूरकर यांचा त्यांच्याच भाच्याने पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मोहन पेंदरकर यांचा भाचा आरोपी पवन श्रीराम मंगाम याला अटक केली आहे. त्याला पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली.
 
मोहन पेंदूरकर यांचा मृतदेह फुलसावंगीनजीक पिंपळगाव फाटा येथे आढळला होता. त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. अखेर हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, ठाणेदार विलास चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला अवघ्या चार तासांत जेरबंद करण्यात आले.
 
पवन मंगाम याच्या कुटुंबासोबत पेंदूरकर यांचा जुना वाद होता. त्या वादावरून पवन याच्या मनात राग होता. त्यावरून तो त्याचा मामा मोहन यांचा खुन करण्याच्या तयारीत होता. एकदा ते दोघे गाडी शिकवण्याच्या निमित्ताने महागाव ते फुलसावंगी रस्त्यावर गेले. तेथे दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर पवने कैचीच्या साहाय्याने मामाच्या छाती आणि डोक्यात वार केले. त्यामध्ये मोहन यांचा मृत्यू झाला.