शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (12:53 IST)

अफजल खानाचा वध

ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. उंच आणि शक्तिशाली अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिकचातुर्याने ठार मारले.
बिजापूरच्या राजा अदिलशहा होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरच्या सर्व क्षेत्रावर आधिपत्य मिळविले होते. 1659 मध्ये बिजापूरचा राजा आदिलशाहसाठी छत्रपती शिवाजी महाराज  जणू एक संकट होते. त्याला समजले होते की जर छत्रपती शिवाजी महाराजांना संपविले नाही तर ते आपल्यासाठी धोकादायक असू शकत. या पूर्वी देखील त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला होता.परंतु त्या मध्ये त्याला यश मिळाले नाही.शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे वध करण्यासाठी अफजल खानाची पाठवणी केली. तो दिवस होता 10 नोव्हेंबर1659 चा.अफजल खान रणनीती बनविण्यात पटाईत होता.त्याने या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे ह्याची हत्या केली होती.त्याने आपल्या सैन्यासह वाटेत येणारे गाव आणि  सर्व मंदिरे उद्ध्वस्त करत वाई पर्यंत पोहोचला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटावयास बोलाविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला घाबरलो आहोत मी तिथे येत नाही आपणच प्रतापगडाला या. असा निरोप धाडला.अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचला.तिथे त्यांच्या भेटण्याची व्यवस्था केली. भव्य शामियाना उभारला होता. प्रतापगडाच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते. कोणत्याही सैन्याला तिथवर पोहोचणे अवघड होते. 
अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठविला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्याघातपाती स्वभावाची जाणीव होती.भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे 10 अंगरक्षकअसतील त्या अंगरक्षकांपैकी एक शामियानाच्या बाहेर थांबेल.अशी अट ठरली. 
भेटीच्या वेळी अफजलखान वेळेआधीच शामियानेत पोहोचला.शामियाना मोठा होता. निःशस्त्र भेटायचे असे ठरले होते. तरी ही अफजलखानाने आपल्या अंगरख्याखाली कट्यार लपवून ठेवली होती. अफजल खान काही कट कारस्थान करून घात पात करेल ह्याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता. म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले ,जिरेटोप खाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत सहज न  दिसणारी अशी वाघनखे लपविली होती.दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले. अफजल खानाची उंचीपुरी देहयष्टी होती तरी ही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता शामियानात पोहोचले. शिवरायांना बघून या शिवबा आमच्या मिठीत या असं म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली. अफजल खान ने त्यांना आपल्या बाहुपाशेत घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाने लपविल्या कट्यारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज पूर्वी पासून सावध होते. अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघनखे काढून  त्याच्या पोटात घुसवून त्याच्या आतड्याचं बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा आपल्या बुद्धी कोशल्यतेने वध केला. अफजलखानाने "दगा दगा" म्हणत आकांत केला त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभारलेला सय्यद आत आला अफजल खान ला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याच्या प्रयत्न केला. तो पर्यंत जिवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्या वर मागून हल्ला करून सय्यद ला ठार मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले. "होता जिवा म्हणून वाचला शिवा "असे म्हणतात.  झाडीत लपलेल्या सर्व मावळांनी अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले. इतिहासात हे युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून ओळखले जाते.