गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (15:03 IST)

मालेगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! पक्षाच्या सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला

मालेगाव महापालिकेतील काँग्रेसच्या सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे मालेगावचे माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही हे पत्र पक्षाला सुपूर्द केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
 
मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमात रशीद शेख, ताहिरा शेख यांच्यासह 28 नगरसेवक यांनी पक्षांतर केलं. यावेळी अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.