सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (16:53 IST)

पहिलीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल- वर्षा गायकवाड

यंदाच्या वार्षिक शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देताना दिली . सर्व मराठी माध्यमांच्या शाळांना एकात्मक आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तक सादर करण्यासाठी शिक्षण विभाग तयार आहे. पहिलीपासून मुलांची मराठी सह इंग्रजी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या वार्षिक शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिलीपासून मराठी माध्यमांच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात येणार आहे. या मुळे विद्यार्थ्यांना मराठी सह इंग्रजी संकल्पना स्पष्ट होईल. 
 
इयत्ता पहिलीपासून सर्व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्षा पासून एकात्मिक  आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तकांच्या सादरीकरणाची शैक्षणिक तयारी करण्यात आली आहे. या साठी उच्च दर्जातील पुस्तके आणण्याची सूचना बालभारतीला देण्यात आली आहे. यंदाच्या पुस्तकांमध्ये मराठी शब्द आणि वाक्य इंग्रजी मजकूर मध्ये असणार. त्यामुळे मुलांचा मूलभूत इंग्रजी शब्दसंग्रह, व्याकरण आणि वाक्यरचना सहज शिकू शकतील.
 
वर्षा गायकवाड म्हणाल्या, मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश आणि लेखन साहित्य पुरवण्यात येते.आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ते पुरवण्यात येणार आहे. अशी घोषणा त्यांनी विधिमंडळात केली.