गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (22:13 IST)

मोठा निर्णय : कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत

महाराष्ट्रात ज्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांना हा निधी देण्यात येणार आहे. राज्य सरकारने शासन निर्णय जारी करत ही घोषणा केली आहे.  राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारवर एका वर्षाला १ लाख ७०४ कोटी रुपयांचा बोझा येणार आहे. आतापर्यंत राज्यात १ लाख ४० हजार ८५७ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना ही मदत देण्यात येणार आहे.
 
RT-PCR / Molecular Tests/RAT या चाचण्यांमधून Positive अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे Clinical diagnosis कोव्हिड-१९ असे झाले होते, याच व्यक्तीचे प्रकरण कोव्हिड-१९ मृत्यू प्रकरणासाठी कोव्हिड प्रकरण म्हणून समजण्यात येईल.
 
वरील प्रमाणे समजण्यात येत असलेल्या कोव्हिड १९ प्रकरणात अशा व्यक्तीचा मृत्यू अशा चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येईल, जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोव्हिड १९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याचे पकडण्यात येणार आहे.
 
कोव्हिड १९ चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येणार आहे.
 
ज्या कोव्हिड १९ च्या प्रकरणात व्यक्ती कोव्हिड १९ पासून बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ च्या कलम १० खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form ४ व ४A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येईल.
 
Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड १९ मुळे मृत्यू” याप्रमाणे नोंद नसली तरीही वरील २.१ ते २.४ मधील अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे रु. ५०,००० च्या सानुग्रह सहाय्यासाठी पात्र असतील.
 
हे सहाय्य मिळणेकरिता कोव्हिड १९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. यासाठी अर्जदार स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल. हा अर्ज दाखल करतांना अर्जदाराने खालील कागदपत्रे / माहिती सादर करणे बंधनकारक आहे. अर्जदाराचा स्वतःचा तपशील. आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक आणि अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशीलाची नोंद करायची आहे.
 
मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र, इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र, मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक, उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या कोव्हिड-१९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील व्यक्तीच्या विदामध्ये (Data) उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी मृत व्यक्तीचा आधार क्रमांक जुळल्यास हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप (Automatically) स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
 
ज्या अर्जदाराकडे मृत व्यक्तीचा आधार तपशील नसेल किंवा हा आधार क्रमांक वरील नमूद Data base मध्ये उपलब्ध आधार क्रमांकाशी जुळला नाही तर अशा अर्जदाराकडे Medical Certificate of cause of Death (MCCD) प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते तपासणीसाठी संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सकाला दाखवण्यात यावे असे राज्य सरकारने शासन निर्णयात म्हटलं आहे.