शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (22:04 IST)

व्हायरल झालेला हा फोटो मॉर्फ, राष्ट्रवादीने दिले प्रत्युत्तर

This photo went viral
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील  हे दिल्लीत संघटनात्मक बैठकीसाठी आले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  राज्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करत राजधानीत दाखल झाले होते. नारायण राणे यांचा दावा आणि त्यानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिल्लीत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं .सोशल मीडियावर दिल्लीत अमित शाह यांच्यासह देवेंद्र फडणीस आणि शरद पवार चर्चा करत असतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. 
 
पण व्हायरल झालेला हा फोटो मॉर्फ केलेला असून याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मॉर्फ केलेला हा फोटो शेअर करत म्हटलं आहे. 'अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मॉर्फ केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर खात्याने असले छुपे उद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती.