1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (16:18 IST)

तब्बल ४२ किलो वजनाचा कटला मासा

big fish
उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात  मासेमारीसाठी गेलेल्या तीन मच्छिमारांना तब्बल ४२ किलो वजनाचा कटला मासा सापडला आहे. हा मासा बारामतीचे मासे व्यापारी शंकर मोरे यांनी १३० रूपये दराने खरेदी केला. जवळपास साडेपाच हजार रुपयात हा एक मासा खरेदी झाला. भिगवण मासळी बाजारातील आडतदार भगवान महाडिक यांच्या आडतीवर आलेला हा मासा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. उजणीत पुर्वी ५० किलोपासून शंभर किलो वजनाचे कटला जातींचे मासे सापडत होते. मात्र अलिकडच्या वीस वर्षातील सर्वांत जास्त वजनाचा आजचा मासा ठरला आहे.