रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (08:57 IST)

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  गट ब 2020 च्या पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाईन मिळणार आहे. या संदर्भात आयोगाकडून एक ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.
 
26 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, कोरोनाचे संकट लक्षात घेता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून   देण्यात आली आहे. या संदर्भात आयोगाकडून एक ट्विट करण्यात आले असून, आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  वेबसाईटवरून विद्यार्थांना ऑनलाईन हॉल तिकीट hall ticket डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेला येताना तसेच हॉलतिकीट डाऊनलोड करताना काय काळजी घ्यावी याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.