बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (13:46 IST)

मोठी बातमी : कोरोनाची तिसरी लाट नागपुरात आली,येत्या 3-4 दिवसात लॉकडाऊन होईल, असे मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर येऊन उभा राहिला आहे. कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात आल्याची बातमी समोर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट नागपुरात दाखल झाली आहे.आणि ही लाट नागपूर मार्गे अवघ्या महाराष्ट्रात वेगाने पसरू शकते अशी शक्यता आणि भीती व्यक्त केली जात आहे.वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार आहे.ही माहिती महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
 
नितीन राऊत हे नागपूरचे पालकमंत्री आहेत. कोरोनाची तिसरी लाट नागपुरात शिरली आहे हे त्यांनी स्वतः कबूल केले आहे. अशा स्थितीत नागपूरहून ही लाट पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागणार.त्यामुळे नागपुरात येत्या 3-4 दिवसात लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
 
कॅबिनेट मंत्री नितीन राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर उभा आहे. त्यांनी नागपुरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रवेश स्वीकारला आहे. त्यांनी पुन्हा एकदा नागपुरात लॉकडाऊन लावण्याचे बोलले आहे. नितीन राऊत यांनी म्हटले आहे की नागपुरात लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा निर्णय 3-4 दिवसात घेतला जाईल. मंत्री नितीन राऊत म्हणाले की, तीन-चार दिवसांत नवीन कोरोना बाधित रुग्णांची किती प्रकरणे येत आहेत ते पाहणार आहोत. महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला आहे. विशेषतः नागपुरातील कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे.
 
नितीन राऊत म्हणाले की परिस्थिती पाहता नागपुरात कमीत कमी वीकेंड लाॅकडाऊन लावणे आवश्यक झाले आहे. यासाठी ते पुढील 3-4 दिवस परिस्थितीवर नजर ठेवतील. दरम्यान, ते व्यापारी, दुकानदार आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी बोलत आहे. चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, माध्यमांशी बोलणार आहे. प्रत्येकाचे मत जाणून घेतल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. पण निर्णय तीन-चार दिवसांत घेणे निश्चित आहे.अशा परिस्थितीत, आठवड्याच्या दिवशी, पुन्हा एकदा सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत रेस्टॉरंट उघडे ठेवण्याचा आदेश येऊ शकतो. दुकानांची वेळ देखील कमी केली जाऊ शकते आणि आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जात आहे.
 
नागपुरात कोरोनाची ही परिस्थिती आहे, त्यामुळे लॉकडाऊनची गरज वाढली आहे
गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना बाधितांची संख्या एकच अंकात येत होती. पण गेल्या काही दिवसांपासून हा आकडा दुहेरी अंकात येऊ लागला आहे. चिंता वाढण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. हे लक्षात घेऊन नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.यानंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याविषयी बोलले.
 
काही नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यात किती डेल्टा प्लस आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे
नितीन राऊत म्हणाले की, काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या मध्ये  डेल्टा प्लस आहे का? आहे तर किती? हे जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. पण गेल्या वेळेची चूक पुन्हा होणार नाही. ताबडतोब कृती करण्यात येईल.