मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (08:31 IST)

मोबाईल बोलण्याच्या नादात शिक्षकाचा जीव गेला

चंद्रपूर जिल्ह्यात मोबाईल बोलण्याच्या नादात एका शिक्षकाने आपला जीव गमावल्याची घटना मूल शहरातील पंचशील नगर भागात घडली आहे.चिरकुटा खोब्रागडे असं मृत शिक्षकाचं नाव आहे.खोब्रागडे हे रात्री कानात हेडफोन लावून मोबाईलवर चालत असताना रेल्वेचा धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. 
 
चिरकुटा खोब्रागडे हे रात्री जेवण झाल्यानंतर घराशेजारी असलेल्या रेल्वे रुळावर फिरायला गेले होते.कानात हेडफोन असल्यामुळे त्यांना रेल्वेचा आवाज आला नाही. गोंदियाकडून बल्लारपूरकडे जाणाऱ्या मालगाडीने त्यांना जोरदार धडक दिली.या धडकेत खोब्रागडे हे दूर फेकले गेले.त्यावेळी त्यांचा जागीत मृत्यू झालाय.खोब्रागडे हे मूल तालुक्यात उथळपेठ इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते.