शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (21:05 IST)

नाशिकात मोठा दरोडा , सुमारे ७० तोळे सोन्याचे दागिने केले लंपास

नाशिक दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे मोठा दरोडा पडला आहे. लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवत शेतकऱ्याच्या घरातून सुमारे ७०  तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या हा घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरोड्यानंतर चोरट्यांना घरात सीसीटीव्ही असल्याचे समजले. तेव्हा ते जाता - जाता सीसीटीव्हीचे हार्ड डिस्क आणि दारातली क्रेटा गाडीही घेऊन गेले.
 
नाशिक शहर व परिसरात दरोड्याची ही मोठी घटना घडली असून, चारच दिवसांपूर्वी नांदुर-शिंगोटे येते धाडसी दरोडा टाकून दहा ते पंधरा लाखांचा ऐवजी कळविला होता. त्या पाठोपाठ ही घटना घडल्याने ग्रामीण भागातील मळे परिसरात राहणाऱ्या शेतकरी, व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
नाशिक शहरापासून नजीक असलेल्या दिंडोरी तालुक्याच्या हद्दीत असलेल्या ढकांबे गावातील बोडके वस्तीवर ही  घटना घडली आहे. पहाटे १ ते १:३० वाजेच्या सुमारास शेतकरी रतन शिवाजी बोडके राहत असलेल्या “शिवकथल” बंगल्यामध्ये पाच ते सहा दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्याआधीच त्यांनी बोडके यांच्या घराबाहेर असलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्याला गुंगीचे औषध दिले.  त्यानंतर बोडके कुटुंब गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. एक-एक करत घरातील सदस्यांना मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोने, पैसे बाहेर काढण्यास सांगितले. घरातील २८ तोळे सोन्याचे दागिने, ४८ तोळे चांदी व ८ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम लुटून नेली. दरोडेखोर निघून गेल्यानंतर बोडके कुटुंबियांनी मदतीसाठी धावा केला.
 
या दरोड्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाठीच्या सुमारास घडलेल्या या दरोड्याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने घटनास्थळी श्वान पथक प्रचारण करण्यात आले मात्र काही धागे हाती लागले नाही.
Edited by - Ratnadeep Ranshoor