1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (15:02 IST)

शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट केलीयं-चंद्रशेखर बावनकुळे

chandrashekhar bavankule
शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट केलीयं. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादू केली असे दिसते. शरद पवारांनी सांगितलं तर उद्या ते काँग्रेसच्या डायसवर देखील बसतील. उद्धव ठाकरे यांनी आयुष्यातील मोठी चूक केली.ते विचारांशी कॉम्प्रोमाइज करत आहेत अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,मी संस्कृती विरोधात काहीच बोललो नाही,जे काही बोललो ते खरेच बोललो. आज ते कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
 
राष्ट्रवादी आणि अजित पवारांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, अनेक पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. कोणी अधिवेशन सोडून जाते? तर कोणी काय करते? राज्यात काय चाललंय हे तुम्हाला माहितीच आहे.राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे कधीही सत्तेत येणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला. गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना वाढवण्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं आहे.मात्र ज्यांनी विचार सोडला त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही.काँग्रेसचे संविधान स्वीकारणे हे उद्धव ठाकरे यांनी ठरवलं आहे.उद्या बहुमत सिद्ध करायला लावलं तर आम्ही सिद्ध करूआज 164 जण आहेत उद्या 184 होतील, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
Edited by : Ratnadeep Ranshoor