शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (15:07 IST)

शरद पवार रुग्णालयात दाखल, 2 नोव्हेंबरला सायंकाळी डिस्चार्ज घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराज गर्जे यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनानुसार, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ते ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल. तसेच त्यांचे नियोजित कार्यक्रमही वेळेत होणार आहेत.
 
या निवेदनात पवारांच्या नियोजित कार्यक्रमांबद्दल म्हटले आहे की, 3 नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.

Edited by: Ratnadeep Ranshoor