1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (20:52 IST)

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार मेगाब्लॉक घोषित

indian railway
मुंबईत  रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला – वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावणार आहेत.
 
मध्य रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक
 
माटुंगा – मुलुंड स्थानकादरम्यानच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या येणार आहेत. तसेच, संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाणे स्थानकानंतर या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवल्या येतील. तसेच, निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने स्थानकावर पोहोचतील.
 
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल फेऱ्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यानंतर या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
 
हार्बर रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल- वाशी या भागांत विशेष सेवा चालवल्या जातील.
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकावरून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
Published by : ratandeep