मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (07:40 IST)

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व

BJP dominates
धुळे  :  जिल्हा परिषदेच्या ३९ व्या अध्यक्षा म्हणून भाजपच्या फागणे गटातून निवडून आलेल्या अश्विनी भटू पवार तर उपाध्यक्षपदी भाजपचे शिंगावे गटाचे देवेंद्र जयराम पाटील यांची ३८ विरूद्ध १६ मतांनी निवड झाली. दोन अपक्षांनी भाजपला साथ दिली. तर शिवसेनेच्या दोन सदस्या तटस्थ राहिल्या. निवडीनंतर भाजपच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
 
पीठासीन अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. अध्यक्षपदासाठी  भाजपकडून अश्विनी भटू पवार, उपाध्यक्षपदासाठी देवेंद्र जयराम पाटील यांनी तर महाविकास आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या (उबाठा) धमाणे गटाच्या सुनीता शानाभाऊ सोनवणे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी कॅांग्रेसच्या बोरविहिर गटाच्या मोतनबाई रावण पाटील यांनी अर्ज दाखल केले.
 
हात उंचावून झालेल्या मतदानात अध्यक्ष,उपाध्यक्षांना प्रत्येकी ३८ तर महाविकास आघाडीच्या अध्यक्ष,उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रत्येकी १६ मते मिळाली.
Edited by : Ratnadeep Ranshoor