बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (13:37 IST)

पाण्यासाठी भाजपचा जालन्यात जलआक्रोश

devendra fadnavis
औरंगाबादनंतर आता जालन्यातील पाणी प्रश्न तापणार असल्याचे चित्र आहे. कारण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही वेळात जालना शहरात जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शहराच्या रखडलेला विकास आणि पाणीप्रश्न यासह अन्य मुद्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जात असल्याची माहिती भाजप आमदार संतोष दानवे यांनी दिली आहे.या मोर्च्यात पाण्यासाठी भाजपचा जालन्यात जलआक्रोश "जनता बोले दिल से देवेंद्र फिरसे" चा मोर्चात नारा लावण्यात आला आहे. 
 
 विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात डॉ   केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे प्रामुख्याने उपस्थित आहेत भाजपने शहरात ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर आणि होर्डिंग्ज लावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालना शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी प्रश्नावरून सर्वसामान्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.