शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (16:22 IST)

तेजस ठाकरे यांचे भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडून कौतुक

महाराष्ट्राचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे छोटे सुपुत्र तेजस ठाकरे यांचे भाजप नेते आशिष शेलार यांनी कौतुक केले आहे. यात त्यांनी महाराष्ट्राची मान उंचावणारे काम केले असल्याचे म्हटले आहे. 
 
तेजस ठाकरे यांनी अंबोली गावमधील हिरण्यकशी नदीमध्ये नुकतीच माश्याची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. या माशावर सोनेरी रंगाचे केस आहेत. असे केस असणारी माशाची ही २० वी प्रजाती आहे. तेजस ठाकरेंनी शोधलेली माशांची ही चौथी प्रजाती आहे. याआधी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पाली आणि खेकड्यांच्या दुर्मिळ प्रजाती शोधल्या होत्या. याबद्दल आशिष शेलार यांनी  ट्विट करत तेजस ठाकरे यांचे कौतुक केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे. ग्रेट!'
 
विशेष म्हणजे शेलार यांनी तेजरी ठाकरे यांच्यासदंर्भातील सामनातील बातमी आपल्या अकाउंटवरुन शेअर करत तेजस यांचे कौतुक केले आहे.