बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (08:29 IST)

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे हा गुन्हा त्यांच्या सुनेनेच त्यांच्याविरोधात पोलिसात दाखल केला आहे.
 
भाजपचे जिल्हा निमंत्रक, कार्यकारिणी सदस्य, माजी जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर यांच्यासह इतर तिघांविरोधात यवत पोलीस स्टेशनला हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माननिक व शारीरीक छळ केल्याचे या गुन्ह्यात नमुद करण्यात आले आहे.
 
तानाजी दिवेकर यांनी आपल्या सुनेला म्हटले होते की तुझ्या वडिलांच्या नावावर असलेला जनावरांचा गोठा तुझ्या नावावर कर. त्यानंतर तो गोठा माझ्या नावावर करं, मला त्या गोठ्यावर कर्ज काढायचे आहे’ असे बोलून सुनेला दमदाटी केली होती.
 
मुलाच्या लग्नात झालेला सर्व खर्च परत कर असा तगादा लावून त्यांनी सुनेला शिवीगाळ, दमदाटी तसेच जिवे ठार करण्याची धमकी देत विनयभंग केल्याच्या तानाजी दिवेकर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.