संबंधित माहिती
- भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते; राज यांचा गौप्यस्फोट
- महाराष्ट्रात कुठेही लसनिर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच;भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी - अजित पवार
- कोरोनालाही जगण्याचा अधिकार - भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत
- शरद पवारांची बार मालकांबाबत कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”- अतुल भातखळकर
- केवळ पवार आडनाव एवढेच आपल कर्तृत्व’ ! रोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात जुंपली
याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय: भातखळकर
"राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले, परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. २००९ च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना २०२१ ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय," असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे."गौप्यस्फोट करण्याकरता माझा असा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. मी भाजपमध्ये होतो, आहे आणि आयुष्यभर राहीन. माझ्या दृष्टीनं पक्ष सोडणं म्हणजे आईचा त्याग करण्यासारखं आहे. हे मी त्यावेळीही सांगितलं होतं आणि त्याचा पुनरूच्चार मी आताही करतोय," असं ते म्हणाले.
याआधी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिकीट मागितलं होतं, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला एका वेबिनारमध्ये बोलताना केला.
